Home > News > ७ लाखांचा अवैद्य गुटखा पकडणाऱ्या 'ती'चा सन्मान...

७ लाखांचा अवैद्य गुटखा पकडणाऱ्या 'ती'चा सन्मान...

७ लाखांचा अवैद्य गुटखा पकडणाऱ्या तीचा सन्मान...
X

गेल्या काही वर्षांपासून महराष्ट्रात गुटखा विकण्यावर आणि खाण्यावर बंदी आहे. तरीही अनेक ठिकाणी गुटखा सर्रासपणे विकला आणि खाल्ला जातो. हा गुटखा दुसऱ्या राज्यांमधून महाराष्ट्रात लपून आणला जातो. असाच एक गुटख्याने भरलेला टेम्पो मुंबई पोलीसांच्या महिला ट्रॅफिक पोलीस भाग्यत्री जगताप (३०) यांनी पकडला आहे. भागश्री या २३ डिसेंबर रोजी मार्वे रोडवर तैनात होत्या, दुपारी सुमारे २:३० च्या सुमारास त्यांचे सहाय्यक पोलीस कर्मचारी जेवण्याच्या सुट्टीवर गेले होते. याच वेळी ड्यूटीवर असलेल्या भाग्यश्री यांनी नंबर प्लेट नसलेला एक छोटा टॅम्पो त्यांच्या दिशेने येताना पाहिला.

टॅम्पोवर नंबर प्लेट नसल्याने त्यांनी या टॅम्पोच्या चालकाला हात दाखवून टॅम्पो थांबवायला सांगितला. टॅम्पो थांबवल्यानंतर त्यांनी चालकाकडे वाहन चालक पारवान्याची मागणी केली. पण त्या चालकाकडे परवानाही नव्हता. त्याला नंबर प्लेट विषयी प्रश्न विचारल्यानंतर गाडीचा नंबर प्लेट तुटल्याचं सांगत त्यानं गाडी रस्त्याच्या कडेला घेण्यास नकार दिला.

भागश्री यांनी त्या चालकाला गाडीत काय आहे? असं विचारलं. त्यावर तो म्हणाला गाडी रिकामी आहे, गाडीत काहीही नाही. त्याचवेळी ट्रफिक सिग्नलची लाईट हिरवी झाल्यामुळे या टॅम्पोमुळे इतर गाड्यांना त्रास होत होता. भाग्यश्री यांनी या चालकाला पोलीसी हिसका दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला घ्यायला लावली. भाग्यश्री यांनी त्या चालकाला खाली उतरवत गाडीच्या मागचं शटर उघडायला सांगितलं.

गाडीचं शटर उघडल्यानंतर चालकाचं खोट उघडं झालं. या गाडीत मालाने भरलेले अनेक पोते आढळून आले. याबद्ल विचारल्यावर चालकाने हा कुरीअरचा माल असल्याचं सांगितलं. भागश्री यांना संशय आल्याने त्यांनी ती सर्व पोती उघडून पाहिली तर यात त्यांना मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचं कळलं. चालकाला हा माल कोणाचा आहे विचारल्यानंतर चालकाने कंपनीचं नाव सांगण्यास नकार दिला.

शेवटी भाग्यश्री यांनी सदर बाब पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली आणि त्या चालकासोबत टॅम्पोत बसून त्याला टेम्पो मालवणी पोलीस स्टेशनला घ्यायला सांगितला. त्यानंतर मालवणी पोलीसांनी आरोपी वाहनचालक शाबन खान याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. तर हा गुटखा पकडून देणाऱ्या भाग्यश्री जगताप यांचा मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सत्कार केला आहे.

भाग्यश्री यांचा सत्कार तर झालाच पण त्यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल त्यांचा फोटोही वाहतूक पोलीस नियंत्रणा कक्षाच्या मुख्यालयात लावण्यात येणार आहे. भाग्यश्री यांच्या शौर्याचं आणि कर्तबगार वृत्तीला मॅक्स वूमनकडून सलाम!

Updated : 6 Jan 2021 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top