Home > News > "प्रोटोकॉल नुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात याव्यात" आमदार श्वेता महाले यांची मागणी

"प्रोटोकॉल नुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात याव्यात" आमदार श्वेता महाले यांची मागणी

प्रोटोकॉल नुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात याव्यात आमदार श्वेता महाले यांची मागणी
X

राज्य सरकार MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता या निर्णयाविरोधात राज्यभरातील MPSCच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरुन उतरून विरोध केला आहे. पुण्यातून या निर्णयाविरोधात आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

या संदर्भात आपलं मत व्यक्त करताना भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या की, "कोरोना,लाकडाऊन यामुळे आधीच बेरोजगारी वाढलेली आहे. अशातच पुन्हा एकदा राज्य सरकारने कुठलीही पूर्व सूचना न देता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे .

माझ्या चिखली मतदारसंघातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी हे गेल्या वर्षभरापासून एमपीएससीची तयारी करत आहेत. ही परीक्षा पुढे ढकलल्यास ते ऐजबार होतील त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा अंत न पाहता तत्काळ आपला निर्णय मागे घ्यावा आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार कोवीड संदर्भातला जो प्रोटोकॉल असेल त्या प्रोटोकॉल नुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात याव्यात."


Updated : 2021-03-12T07:01:03+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top