Home > News > खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
X

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी समाज माध्यमांवर सांगितला आहे. त्याने ट्विट करत त्यांना कोणाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या. '

महाराष्ट्रासह देशात कोरोना रुगणसंख्येत वाढ..

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्याबरोबर ओमायक्रॉनबाधितांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. देशतील 21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधि रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे.

Updated : 29 Dec 2021 8:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top