Home > News > आत्ता गप्प बसू पण जेव्हा मतदान येईल तेव्हा विरोधात गेलेल्यांना पाहून घेऊ - खा. सुप्रिया सुळे

आत्ता गप्प बसू पण जेव्हा मतदान येईल तेव्हा विरोधात गेलेल्यांना पाहून घेऊ - खा. सुप्रिया सुळे

आत्ता गप्प बसू पण जेव्हा मतदान येईल तेव्हा विरोधात गेलेल्यांना पाहून घेऊ - खा. सुप्रिया सुळे
X

सगळ्या गोष्टींवर जीएसटी वाढवल्याने केंद्र सरकार प्रेशर मध्ये आहे त्यामुळेच हा दर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या घाटकोपरमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात बोलत होत्या.

खासदार सुप्रिया सुळे या मुंबईत पर्यावरणावर आधारीत एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पर्यावरणाची निगा राखावी या बाबत सांगितले. पर्यावरण जगले तर माणुसकी जगेल. आपल्या सर्वांसमोर पर्यावरण जपण्याचे आवाहन आहे. असं म्हणत त्यानी लहान पणीच्या आठवणींना उजाळा दिला.


लहानपणी कुठले पाणी प्यायचं असं कधीच वाटलं नाही. त्यावेळी सॅनिटायजर नव्हते. मिळेल ते पाणी प्यायलो पण तेव्हा कधी आमचं पोट खराब झाले नाही. कधी कचरा दिसला नाही. पण सध्या हे सगळं वाढलं आहे. डेंग्यू ची माहिती ही आता द्या. माझ्या लहान पाणी इतके आजार नव्हते, आता हे सगळे बदल झाले आहे त्यामुळे कचरा रस्त्यावर इतरत्र फेकायचा नाही आणि फेकूही द्यायचा नाही. या सोबत त्यांनी आरेवरही त्यांची भुमिका मांडली. आरेच्या विषयात चर्चेनम मार्ग काढले पाहिजेत असं त्य़ा म्हणाल्या. सोबतच या कार्यक्रमाचे आयोजक राखी यांचे त्यांनी आभार मानले.

केंद्रावर प्रेशर म्हणून दरकपात

आज केंद्र सरकारने सर्वच गोष्टींवरचा जीएसटी वाढवला आहे. केंद्र सरकार प्रेशरमध्ये आहे असं म्हणून त्यांनी ही दरकपात केली आहे. पण त्याने काही फरक पडणार नाही. लाईट बिलांबाबत अजित दादा प्रयत्न करीत होते. पण यांनी आल्या आल्या लगेच गॅस चे दर वाढवले, वीज बिल वाढवले. महाराष्ट्र आणि मुंबई चे अनेक प्रकल्प हे दुसऱ्या राज्यात नेण्याचे प्रयत्न ते करतात. हे दुर्दैवी आहे. बुलेट ट्रेन करण्या आधी या सरकारने आधी मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन सुधारावी. या शिवाय महाविकास आघाडी ने एकत्र केंद्र सरकार विरोधात लढावं असे पवार साहेबांना वाटत तसेच चर्चेतून मार्ग निघतील असंही त्या म्हणाल्या.

80 टक्के समाजकारण 20 राजकारण हे आम्हाला पवार सांगतात. सत्ता ही जनतेच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्यासाठी असते, पण आता टेलिव्हिजन बघितले की वाटत सत्ता गुवाहाटी ला, गुजरात ला जाण्यासाठी असते. ही सत्ता नाही, दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जण इतर पक्षात गेले, पक्ष फोडले, पण गुवाहाटी ला विमानात बसून नाही, डंके की चोट पर गेले. हे असं पहिल्यांदाच झालं आहे. आम्ही गुवाहाटी साठी नाही निवडून आलो. आसाम वर आमचे प्रेम आहे, पण आम्ही कर्म भूमीमध्येच काम करायचं असतं. कोव्हिडं काळात माणुसकीचे दर्शन झाले , कोणी जात धर्म बघितला नाही. जाती पतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला देश बघायचा आहे. रेमडीसिव्हर याकुब हमीद या माणसाने दिले, आणि पुनावला यांनी लस दिली. दोघेही अल्प संख्याक! त्यांनी माणुसकी बघून जीवनदान दिले. आपल्याला विष पसरवायचे नाही, आपले राज्य हे चांगले लोकांकडून कसे चालेल , या राज्याची वैचारिक बैठक आहे, या विरोधात असेल त्यांच्याशी लढले पाहिजे, आता गप्प बसायचे पण जेव्हा मतदान येईल तेव्हा बघायचे. मी माझ्या लोकसभा मतदार संघात असाच कार्यक्रम घेणार, इथे मी येऊन हे शिकले आहे, म्हणून मी आयोजकांचे आभार मानते.

Updated : 15 July 2022 8:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top