Home > News > ''हा गोपनीयतेचे भंग आहे'' खासदार महुआ मोईत्रा यांनी डेकॅथलॉनविरोधात केली तक्रार

''हा गोपनीयतेचे भंग आहे'' खासदार महुआ मोईत्रा यांनी डेकॅथलॉनविरोधात केली तक्रार

टीएमसी खासदार महुआ मोइत्रा या दिल्ली येथील डिकॅथलॉन या स्टोअरमध्ये कॅश घेऊन खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. ज्यावेळी त्यांनी खरेदी केली त्यावेळी बिल करताना त्यांच्याकडून मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी मागण्यात आला. यावेळी त्यांनी खरेदी करत असताना मोबाईल नंबर सांगण्यासाठी विरोध केला. व ग्राहक कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा कारणावरून या कंपनीविरोधात त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे.

हा गोपनीयतेचे भंग आहे खासदार महुआ मोईत्रा यांनी डेकॅथलॉनविरोधात केली तक्रार
X

टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी गुरुवारी स्पोर्टिंग ब्रँड डेकॅथलॉनविरोधात तक्रार दाखल केली.ल आहे. त्यांच्या पोस्टमध्ये, त्यांनी दिल्ली-एनसीआरच्या अन्सल प्लाझा येथील डेकॅथलॉन स्टोअरला भेट देण्याचा त्यांचा खरेदीचा अनुभव शेअर केला. महुआ मोईत्रा तिच्या वडिलांसाठी ट्राउझर्स खरेदी करण्यासाठी डेकॅथलॉन स्टोअरमध्ये पोहोचली होती. जेव्हा ती बिलिंग काउंटरवर पोहोचली तेव्हा तिला तिचा फोन नंबर आणि ईमेल आयडी देण्यास सांगितले, पण तिने नकार दिला. यानंतर संतापलेल्या महुआ मोइत्रा यांनी ट्विट करून हे गोपनीयता आणि ग्राहक कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

नक्की काय प्रकरण आहे पाहुयात..

टीएमसी खासदार महुआ मोइत्रा या दिल्ली येथील डिकॅथलॉन या स्टोअरमध्ये कॅश घेऊन खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. ज्यावेळी त्यांनी खरेदी केली त्यावेळी बिल करताना त्यांच्याकडून मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी मागण्यात आला. यावेळी त्यांनी खरेदी करत असताना मोबाईल नंबर सांगण्यासाठी विरोध केला. त्यानंतर या कंपनीविरोधात त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे.

त्यांनी या दुकानातून त्यांच्या वडीलांसाठी 1 हजार 499 रुपयांची ट्राऊजर खरेदी केली होती. दिल्ली येथील अंशल प्लाझा येथील डिकॅथलॉन इंडिया येथून त्यांनी ही खरेदी केली व त्यानंतर बिल करत असताना त्या दुकानाच्या मॅनेजरने त्यांना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सांगण्यास सांगितले। यावेळी त्यांनी डिकॅथलॉन इंडिया मला माफ करा, आपण ग्राहक कायद्याचे उल्लंघन करत आहात. असे म्हणत त्यांनी फोन नंबर आणि ईमेल आयडी देण्यास नकार केला. आणि या दुकानात आलेला अनुभव त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Updated : 29 April 2022 3:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top