Home > News > अल्पसंख्यांक UPSC विद्यार्थ्यांसाठी खा. फौजिया खान यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र

अल्पसंख्यांक UPSC विद्यार्थ्यांसाठी खा. फौजिया खान यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र

अल्पसंख्यांक UPSC विद्यार्थ्यांसाठी खा. फौजिया खान यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र
X

खासदार फौजिया खान यांनी केंद्रीय मंत्री मुक्तार नक्वी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुंबईच्या हज हाऊसमध्ये UPSC परिक्षार्थीच्या असुविधेवर लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.




राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तसेच रातज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी नुकतंच केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुक्तार नक्वी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुंबईच्या हज हाऊसमध्ये होत असलेल्या UPSC परिक्षार्थींच्या असुविधेवर लक्ष वेधत योग्य त्या कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते पत्र ट्विट करत त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, "हज हाऊस मुंबई ची इमारत ही फक्त एक महिना हज यात्रेकरूंसाठी उपयोगी पडते आणि 11 महिने ती रिकामी असते. या इमारतीतच 200 विद्यार्थ्यांना UPSC चे प्रशिक्षण देण्यासाठी सर्वोच्च दर्जाच्या भौतिक सोयी सुविधा निर्माण केले आहेत. परंतु आता फक्त 100 विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जात आहे. जे विद्यार्थी UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण आहेत, आणि पूर्वीच्या बॅचचे आहेत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच जेवण आणि राहण्याच्या व्यवस्थेवरील शुल्कात मिळणारे अनुदान रद्द केले गेले आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम हा अल्पसंख्याक सामाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना बाधा आणणारा आहे. सर्व प्रकरणाची तात्काळ दखल घेउन योग्य ते निर्देश देण्यात यावेत जेणेकरून अल्पसंख्याक समाजातील होतकरू आणि हुशार तरुणांना न्याय मिळेल. व प्रधानमंत्री 15 कलमी अल्पसंख्याक कार्यक्रमाची उद्दिष्टे पूर्ण होतील.", असं म्हटलं आहे.

कोण आहेत फौजिया खान?

फौजिया खान या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तसेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष आहेत. यासोबतच त्या संसदेत राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी राज्याच्या शैक्षणिक, आरोग्य, महिला व बालविकास मंत्री म्हणून कारभार पाहिला आहे.

Updated : 20 Jan 2022 3:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top