Home > News > राज्यसभेत GST विरोधात हातात दूध, ताक व दह्याच्या पिशव्या घेऊन निदर्शने..

राज्यसभेत GST विरोधात हातात दूध, ताक व दह्याच्या पिशव्या घेऊन निदर्शने..

राज्यसभेत GST विरोधात हातात दूध, ताक व दह्याच्या पिशव्या घेऊन निदर्शने..
X

आज राजसभेत विरोधकांनी GST चा निर्णय परत घ्या अशा घोषणा देत हातात दुध, दही व ताकाच्या पिशव्या घेऊन निदर्शने केली. महागाई, GST वरून आज देखील विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज उद्या ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेत देखील महागाईच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मागच्या तीन दिवसांपासून महागाईवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज सकाळी तिसऱ्या दिवशी विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. आता कामकाजाला सुरवात झाली असून पुन्हा लोकसभेत गदारोळ सुरु आहे. तर राज्यसभेचे कामकाजही सभागृहातील गोंधळामुळे उद्या ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आज राजसभेत विरोधकांनी GST चा निर्णय परत घ्या अशा घोषणा देत हातात दुध, दही व ताकाच्या पिशव्या घेऊन निदर्शने केली. महागाई, GST वरून आज देखील विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज देखील तहकूब करण्यात आहे.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकार लोकसभेत चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला. '' तेलाच्या किमती वाढत आहेत, महागाई वाढत आहे, पण सरकार त्यावर चर्चा करू इच्छित नाही. संसदेत या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा न करणे हेही असंसदीय असल्याचं राहुल गांधी यांनी म्हंटल आहे.

यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला. इराणी म्हणाल्या कि, राहुल गांधी यांची संसदेत ४० टक्के उपस्थिती आहे आणि ते इतरांवर चर्चा करत नसल्याचा आरोप करत आहेत. राहुल गांधी ज्यांचा राजकीय इतिहास यावरूनही दिसून येतो की ते कधी देशात असतात आणि कधी देशाबाहेर असतात. असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

महागाईवर चर्चेच्या मागणीवरून गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सातत्याने गदारोळ सुरू असून, त्यामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. मंगळवारी काँग्रेस खासदारांनी सभागृहातील गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली. आजही विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे..

Updated : 20 July 2022 9:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top