Home > News > महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोदी सरकारचा 'शक्तीवंदन' कार्यक्रम

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोदी सरकारचा 'शक्तीवंदन' कार्यक्रम

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोदी सरकारचा शक्तीवंदन कार्यक्रम
X


खामगाव: देशातील महिला बचत गटांचे जाळे मोठे असले तरी, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीचा वेग मंद होता. मात्र, गेल्या 10 वर्षांत मोदी सरकारने महिलांच्या धडपडीला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून 'शक्तीवंदन' कार्यक्रम राबवण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महिला बचत गटांना एनजीओच्या सहाय्याने विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना आर्थिक शक्ती देणे आणि सर्वांगीण विकास करणे हा आहे. असं मत भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या महाराष्ट्र अध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केल आहे.




नुकत्याच सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये 2 कोटी नाही तर 3 कोटी लखपती दीदी बनविण्याचे लक्ष्य मोदी सरकारने ठेवले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

खामगाव मतदारसंघात 'शक्तीवंदन' कार्यक्रमाचा प्रभाव:

दरम्यान खामगाव मतदारसंघातील आमदार आकाशभाऊ फुंडकर यांनी 'शक्तीवंदन' कार्यक्रमाअंतर्गत बचत गटाच्या महिलांशी संवाद साधला. या कार्यक्रमात उत्तम काम करणाऱ्या NGO/CRP तसेच बचतगटांना सन्मानित करण्यात आले असून शक्तीवंदन कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान विविध उपक्रमांची माहिती देत महिलांच्या ॲक्टिव्ह सहभागासाठी उपाययोजना केल्या गेल्या. यावेळी महिलांचा उत्साहही प्रचंड होता.




विविध उपक्रमांची माहिती देत महिलांच्या ॲक्टिव्ह सहभागासाठी उपाययोजना केल्या असल्याच चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. बचत गटांसोबतच्या या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल खामगाव भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याचे चित्रा वाघ यांनी आभार मानले आहेत.

Updated : 5 Feb 2024 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top