Home > News > मॉडर्न महाविद्यालय फिरोदीया करंडकाच्या अंतिम फेरीत दाखल… विद्यार्थ्यांचा मोठा जल्लोष !

मॉडर्न महाविद्यालय फिरोदीया करंडकाच्या अंतिम फेरीत दाखल… विद्यार्थ्यांचा मोठा जल्लोष !

राज्यभरात सध्या नाट्य स्पर्धा आणि एकांकिका महोत्सवांची लाट आली आहे. त्यात जुन्या आणि प्रसिध्द असलेल्या फिरोदीया करंडकाच्या अंतिम फेरीत शिवाजी नगरचं मॉडर्न महाविद्यालय दाखल झालं आहे.

मॉडर्न महाविद्यालय फिरोदीया करंडकाच्या अंतिम फेरीत दाखल… विद्यार्थ्यांचा मोठा जल्लोष !
X

अनेकांनी शून्यातून विश्व निर्माण करत सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवला आहे. मात्र यामधील अनेक कलाकार यांची सुरुवात ही महाविद्यालय स्तरावर असलेल्या फिरोदिया करंडक पासून झाली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जपत अनेक नवीन होतकरू कलाकारांना आपली कला प्रभावीपणे व्यक्त करण्याचे साधन म्हणजे हा करंडक. त्याच करंडकासाठी 35 महाविद्यालयांमधून पुणे येथील मॉर्डन महाविद्यालय अंतिम फेरीत दाखल झाले आहे. याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...

Updated : 15 March 2022 1:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top