Home > News > त्या दोन मॉडेल्सचा अपघात की खून? कुटूंबियांना तर...

त्या दोन मॉडेल्सचा अपघात की खून? कुटूंबियांना तर...

त्या दोन मॉडेल्सचा अपघात की खून?  कुटूंबियांना तर...
X

मिस केरळ 2019 आणि दक्षिण भारत 2021 ची विजेती अन्सी कबीर आणि मिस केरळ 2019 ची उपविजेती अंजना शाहजहान यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद होत आहे. रस्त्याच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असला तरी खून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: हॉटेल मालकाने व्हिडीओ फुटेज गायब केल्याने याकडे अपघातापेक्षा खून म्हणून जास्त पाहिले जात आहे.भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळली

1 नोव्हेंबर रोजी अंसी कबीर आणि अंजना शाहजहान कारने कोचीहून परतत होत्या. यादरम्यान महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची कार झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दोघींचा जागीच मृत्यू झाला. मॉडेल्ससह कारमध्ये दोन पुरुष देखील उपस्थित होते, त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला हा केवळ अपघात असल्याचं मानलं जात होतं, मात्र जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतशा अशा अनेक गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे या मॉडेल्सच्या हत्येचा संशय अधिक गडद झाला.


गहाळ डीव्हीडी सापडली, पण दुसरी गहाळ झाली

या दोन्ही मॉडेल्सनी कोचीमधील हॉटेल '18 हॉटेल' मध्ये डीजे पार्टीला हजेरी लावली होती. येथून परतत असताना रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता त्या दिवसाचे फुटेज गायब असल्याचे आढळून आले. कडक चौकशीत, कर्मचाऱ्यांनी सांगितले की, हॉटेलच्या मालकाने रॉय व्हायलेटने फुटेज असलेली डीव्हीडी सोबत घेतली आहे. यानंतर पोलिसांनी रॉय यांना डीव्हीडी सादर करा अन्यथा कारवाईसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. हॉटेल मालकाने गहाळ झालेली डीव्हीडी मंगळवारी पोलिसांना परत केली आहे, मात्र आणखी एक डीव्हीडी गहाळ झाल्याचेही समोर आले आहे.

दुसऱ्या गाडीशी रेस चालू होती

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत हॉटेल मालकासह सहा जणांना अटक केली आहे. रॉय व्हायलेटवर सध्या पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, मॉडेलची कार दुसऱ्या कारसोबत रेस करत होती. दोन्ही गाड्यांचा वेग खूप होता. अशा स्थितीत दुचाकीस्वार अचानक दिसल्याने चालकाचा तोल बिघडला आणि कार झाडावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कार चक्काचूर झाली.


हॉटेल मालकावर कुटुंबीयांना संशय

अन्सी कबीर आणि अंजना शाहजहान यांच्या कारसोबत रेसिंग करत असलेली आणखी एक कार हॉटेल मालक रॉय व्हायलेटच्या जवळ बसलेला व्यापारी सिजू चालवत होता. अन्सी कबीरच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच हॉटेल मालकावर संशय होता. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, त्यानंतरच सत्य बाहेर येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. रॉय वायलेटचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्यानंतर या प्रकरणात त्याचा सहभाग असण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत सध्या काहीही स्पष्ट केलेले नाही.

Updated : 18 Nov 2021 12:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top