Home > News > बिहारमध्ये भर दिवसा महिला मॉडेलवर गोळीबार, मॉडेल मोना रायचा मृत्यू

बिहारमध्ये भर दिवसा महिला मॉडेलवर गोळीबार, मॉडेल मोना रायचा मृत्यू

बिहारमध्ये भर दिवसा महिला मॉडेलवर गोळीबार, मॉडेल मोना रायचा मृत्यू
X

पाटणा : बिहारमध्ये प्रसिद्ध मॉडेल मोना रायवर गोळीबार करण्यात आला आहे, या घटनेची मोना रायचा मृत्यू झाला. मोनाची गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, आज पहाटे चार वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मोनावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. तिच्या हत्येमागील नेमकं कारण काय ? ते अद्याप उलगडलेलं नाही. मोनाच्या मृत्यूमागे काहीतरी मोठं रहस्य दडल्याची चर्चा सुरू आहे. पण पोलीस अद्याप एकाही आरोपीला पकडू शकलेले नाहीत.

बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात भर दिवसा बाईकवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी मॉडेल अनिता देवी उर्फ मोना रॉय हिच्यावर गोळीबार केला. ही घटना शहरातील राजीव नगर पोलीस ठाणे क्षेत्रातील रामनगरी येथील बसंत कॉलनीमध्ये घडली. आरोपी गोळीबारानंतर पसार झाले. यावेळी मोना राय सोबत तिची मुलगी देखील होती. तिने आरडोओरड केल्यावर मोनाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मागील पाच दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे मोनाची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली.

Updated : 17 Oct 2021 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top