Home > News > UPSC देशात पहिला आलेल्या इशिताचा मॉक interview व्हायरल...

UPSC देशात पहिला आलेल्या इशिताचा मॉक interview व्हायरल...

UPSC देशात पहिला आलेल्या इशिताचा मॉक interview व्हायरल...
X

नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि या निकालात मुलींनी मोठी बाजी . इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला. या सगळ्या निकालानंतर इशिताचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे हा व्हिडिओ आहे तिच्या मॉक इंटरव्यूचा. इशिता जेव्हा या इंटरव्यू मध्ये प्रत्येक प्रश्नांची उत्तर देत आहे त्यावेळी तिचा असलेला कॉन्फिडन्स आणि अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक कठीण प्रश्नाचे उत्तर इशिता कशाप्रकारे देते हे सर्वांनी एकदा पाहण्यासारखा आहे...

दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण घेतलेल्या इशिता किशोरने UPSC मद्ये देशात पहिला क्रमांक मिळवला. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे अनेकजण गुगलवर तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, इशिता किशोरच्या मॉक मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये इशिता किशोर कॉलेजियम सिस्टम, रशिया-चीनसह भारताचे संबंध, खासगीकरण, देशाची अर्थव्यवस्था यासहित अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर आपलं मत मांडत आहे. व्हिडीओत इशिता किशोर अत्यंत आत्मविश्वासाने पाचही मुलाखतदारांच्या प्रश्नांना धडाधड उत्तरं देताना दिसत आहे...

या मुलाखतीत इशिता च्या शाळेचा सुद्धा उल्लेख झाला आहे. शाळेत असताना ती सर्वगुणसंपन्न होते सर्व विषयात तिला चांगले गुण मिळत होते. त्या पाठीमागे नक्की काय कारण होतं? तर याविषयी स्वतः निश्चितच सांगते की, तिला स्पोर्ट्समध्ये फार आवड होती. शाळेत ती ऑलराऊंडर होती आणि ऑलराऊंडर होण्यासाठी नेतृत्व कौशल्य आणि संघाला सोबत घेऊन खेळण्याचे कौशल्य गरजेचे आहे..

निशिता दरवाजातून आत येते तिला बसण्यासाठी सांगितलं जातं आणि मुलाखतीला सुरुवात होते. एकदा या मुलाखतीला सुरुवात झाली की शेवटपर्यंत या मुलाखतीत पाचही मुलाखतकार तिला अनेक प्रश्नांमध्ये पेचात पकडण्याचा प्रयत्न करत आहेत पण तिचा हजरजबाबीपणा आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला अपार अभ्यास हे या मुलाखतीत आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल किंवा नसाल तरी देखील प्रत्येकाने ही मुलाखत पहावी अशी ही मुलाखत आहे.

Updated : 26 May 2023 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top