Home > News > राज ठाकरे मुन्नाभाई तर उध्दव ठाकरे कलानगरचे सर्किट? , शालिनी ठाकरे बरसल्या....

राज ठाकरे मुन्नाभाई तर उध्दव ठाकरे कलानगरचे सर्किट? , शालिनी ठाकरे बरसल्या....

राज ठाकरे मुन्नाभाई तर उध्दव ठाकरे कलानगरचे सर्किट? , शालिनी ठाकरे बरसल्या....
X

राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसी मैदानावर सभा घेतली. या सभेत त्यांनी राज ठाकरे यांना मुन्नाभाई म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्य़ा या टीकेनंतर आता मनसेकडूनही उत्तरं येउ लागली आहेत. मनसेच्या महिला अध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांना कलानगरचे सर्किट म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

शनिवारी झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घाणाघाती टीका केली. उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंना थेट मुन्नाभाई म्हणत त्यांच्यावर शाल पांघरून स्वतःला बाळासाहेब समजू लागले आहेत अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता मनसेच्या नेत्यांनी उत्तरं द्यायला सुरूवात केली आहे.

मनसेच्या महिला अध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी एक फोटो पोस्ट करत उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे यांच्या अर्ध्या चेहऱ्यावर बाळ ठाकरेंचा फोटो लावलेला फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्यांनी ट्वीटमध्ये, "कधी बाळासाहेब दिसतात, तर भगवी शाल घेऊन फिरतात असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो.... फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही...!!!", असं लिहीत टीका केली आहे.

त्यांच्या या टीकेवर आता पुन्हा शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 15 May 2022 7:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top