Home > News > मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी..

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी..

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ‘सावध राहा’ अशी धमकी देणारी चिट्ठी मिळाली आहे. यावर वसंत मोरे यांनी धमकी देणाऱ्याला ‘बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत (तात्या) मोरे आहे’ असा इशारा दिला आहे..

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी..
X

वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणारी एक चिट्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीत 'सावध राहा रुपेश' असं लिहिल आहे. आपल्या मुलाला धमकीची चिट्ठी मिळाली असल्याचं स्वतः वसंत मोरे यांनी सांगितले आहे. हा सर्व प्रकार घडला आहे तो पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याची आयोजनाची संपूर्ण तयारी रुपेश आणि त्यांच्या मित्र परिवाराने केले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा मुलगा ज्या गाडीने आला त्या गाडीच्या काचेवर ही चिठ्ठी ठेवण्यात आली होती.

राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो ते समजत नाही. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची काम करायची आणि कोणीतरी आपल्या कुटुंबाबाबत असा विचार करायचा? असं म्हणत वसंत मोरे यांनी फेसबुक वरती मुलाला आलेल्या धमकी बाबत एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये नक्की काय म्हटला आहे पाहूयात,

मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो...

आमचेही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही. राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही. गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते, पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये

"सावध रहा रुपेश" आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली. तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ? हे का तेच कळत नाही...

भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत. तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय. बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत ( तात्या ) मोरे आहे...!

Updated : 17 Jun 2022 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top