Home > News > ''धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ..'' मनसेची बोचरी टीका

''धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ..'' मनसेची बोचरी टीका

धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ.. मनसेची बोचरी टीका
X

''धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे..''अशी बोचरी टीका मणसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेवर केली आहे. खरतर काही दिवसांपूर्वी मुळुमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षात बंड करत शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत ४० हुन अधिक आमदार नेट भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळाले. आमदारांपाटोपाठ १२ खाजदारानी देखल उद्धव ठाकरेंना रामराम ठोकला. तर दुसरीकडे ठाणे, मुंबई येथील स्थानिक कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात सामील होत असल्याचं चित्र आहे. ज्यावेळी महाविकास अआघाडीचे सरकार होते त्यावेळी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर अनेक टीका केल्या. आता ठाकरेंना पायउतार व्हावं लागल्यानंतर मनसेने शिवसेनेवर दररोज टीकेचा धनुष्यबाण सोडण्यास सुरवात केली आहे. माणसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी काल पुन्हा ''रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणुन उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे', अशा आशयांचे ट्विट करत शालीनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर अत्यंत बोचरी टीका केली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचं चिन्ह असलेले धनुष्यबाण नक्की कोणाचे इथपर्यंत आता हा वाद पोहोचला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे काटकडून केला जात आहे. एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' देण्याची मागणी केली आहे. तर मूळ शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण हा आपल्याकडेच राहील, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची असा वाद सध्या सुरु आहे.

Updated : 22 July 2022 2:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top