Home > News > "तु तुझा प्रचार कर बाकी मी बघतो" रुपाली ठोंबरे यांच्या मागे राज हस्त

"तु तुझा प्रचार कर बाकी मी बघतो" रुपाली ठोंबरे यांच्या मागे राज हस्त

तु तुझा प्रचार कर बाकी मी बघतो रुपाली ठोंबरे यांच्या मागे राज हस्त
X

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला राज्यभर सुरु झाले आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादी, मनसे सर्व पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. पण, मनसेच्या पुणे पदवीदार मतदार संघ्याच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना साताऱ्यातून जिवे मारण्याच्या धमकीचा दूरध्वनी आला आणि एकच खळबळ उडाली. या बाबत पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिस कारवाईस प्रारंभ झाला आहे. याच प्रकरणावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करुन दिलासा दिला आहे. ''तु तुझा प्रचार कर, बाकी मी बघतो''असे सांगून राज ठाकरे यांनी फोनवरुन दिलासा दिला. तसेच, पाटील यांची विचारपूस करत प्रचारबाबतही माहिती घेतली.

रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची शनिवारी (21 नोव्हेंबर) धमकी देण्यात आली होती. आमदार होण्याची स्वप्नं पाहू नकोस, मारुन टाकीन, अशा शब्दात साताऱ्यातून फोन करत एका अज्ञात व्यक्तीने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर पाटील यांनी अज्ञाताविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल केलेलीआहे.

Updated : 24 Nov 2020 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top