Home > News > जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवराळ भाषा वापरणं कितपत योग्य?

जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवराळ भाषा वापरणं कितपत योग्य?

जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवराळ भाषा वापरणं कितपत योग्य?
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिना निमित्त औरंगाबाद मध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये देखील त्यांनी शिवराळ भाषा वापरली. फक्त 1 मे च्याच नाही तर 12 एप्रिलच्या सभेमध्येही त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला होता. पण अशी शिवराळ भाषा वापरणं कितपत योग्य आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे की नेहमीच त्यांच्या आक्रमक भाषणासाठी ओळखले जातात. मनसेचे लोकप्रतिनिधी निवडून येत नसले, पक्ष मुंबई,ठाण्या - पुण्याबाहेर विस्तारला नसला तरीदेखील राज ठाकरेंच्या सभेला प्रचंड गर्दी होत असते. लाखो लोक त्यांची भाषणं ऐकायला मैदानामध्ये उपस्थित असतात. शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांच्या प्रमाणेच राज ठाकरे यांची देखील वक्तृत्व शैली आहे. जिला ठाकरी शैली असंही म्हणतात. याच ठाकरी शैलीमध्ये शिव्यांचा वापर या काका पुतण्याच्या जोडीने सर्रासपणे केलेला आपल्याला दिसून येतो.

जाहीर सभेमध्ये शिव्या देणं कितपत योग्य?

यांची भाषणं आज पर्यंत श्रोत्यांनी अनुभवली ऐकली आणि त्याचा आनंद घेतला. बाळ ठाकरे असो किंवा राज ठाकरे यांच्या भाषणात वापरल्या गेलेल्या शिव्यांचाही लोकांनी आनंद घेतला पण जाहीर सभेमध्ये अशा शिव्या देणे कितपत योग्य आहे? फक्त ठाकरी शैलीच्या नावाखाली भाषणांमध्ये शिव्या देण्याचं समर्थनही होऊच शकत नाही. शिव्या न देता ही भाषणं कशी गाजवता येतात हे आपल्याला लोकमान्य टिळक, भाई संगारे, प्र.के.अत्रे या वक्त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे.

कधी कधी दिल्या गेल्या शिव्या?

राज ठाकरेंनी त्यांच्या 12 एप्रिल च्या सभेत संजय राऊत यांना लवंडे म्हटलं होतं. पण त्यांचा दाखल देताना त्यांनी चुxया, भxव्या या शिव्यांचा उच्चार केलाच होता. बरं राज ठाकरेंनीच फक्त शिव्या वापरल्या होत्या असं नाही. काही काळापूर्वी संजय राऊत यांनी वरील शिव्यांचा वापर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासाठी पत्रकार परिषदेत केला होता. खुद्द शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी देखील विद्यमान केंद्रिय मंत्री तसेच भाजप नेते शिवाय पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना भरसभेत येxxव्या म्हटलं होतं.

या अशा शिवराळ भाषणांना एक कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावं हेच खरं!

Updated : 2 May 2022 6:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top