Home > News > MPSC देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सारखी निष्क्रिय झाली आहे का? - आमदार मेघना बोर्डीकर

MPSC देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सारखी निष्क्रिय झाली आहे का? - आमदार मेघना बोर्डीकर

स्पर्धा परीक्षांचा गोंधळ काही केल्या संपत नसून मागील काही दिवसापासुन MPSC चे पोर्टल बंद आहे. MPSC कडून विद्यार्थ्यांना नोटीस काढून धमकी देण्यात येत आहे. MPSC देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सारखी निष्क्रिय झाली आहे का? आमदार मेघना बोर्डीकर यांचा घणाघात...

MPSC देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या सारखी निष्क्रिय झाली आहे का? - आमदार मेघना बोर्डीकर
X

भारत हा कृषिप्रधान देश आहे. या कृषिप्रधान देशात महाराष्ट्रच योगदान आपल्याला माहीतच आहे. पण याच महाराष्ट्रात आता शेतकरी आत्महत्या हा गंभीर प्रश्न झाला आहे. हा प्रश्न गंभीर असताना सध्या राज्यात ST कर्मचाऱ्यांरी व स्पर्धा परीक्षा करणारी मुलं देखील आत्महत्या करत आहेत. राज्यात ज्या प्रकारे आत्महत्या होत आहेत त्यावरून आमदार मेघना बोर्डीकर यांनी सरकारवर घणाघात केला आहे. ' कर्जबाजारी ने शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपूर्ण देशाने पहिल्या , पण ST कामगारांना व परीक्षा न झाल्याने MPSC परीक्षार्थींना आत्महत्या करण्याची वेळ देशात कदाचित फक्त महाराष्ट्रातच आली असेल..! स्वप्नील लोणकर नंतर हा दुसरा बळी महाविकास आघाडी सरकार अजुन किती जणांचे बळी घेणार..? असं ट्विट करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर अद्यापही ठोस भुमिका न घेतल्याने संप अधिक तिव्र झाल आहे. राज्यातील काही ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर आता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या एका मुलाने आत्महत्या करत स्वतःच जीवन संपवलं. अमर मोहिते या 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. अमर हा पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. करोना काळात अनेकदा परीक्षा रद्द झाल्यानंही तो सतत तणावात येऊन त्याने आत्महत्या केली. अमरच्या आत्महत्येनंतर 'MPSC चा गोंधळ काही केल्या संपेना! दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही शासन गंभीर नाही. मागील काही दिवसापासुन MPSC चे पोर्टल बंद आहे. MPSC कडून विद्यार्थ्यांना नोटीस काढून धमकी देण्यात येत आहे. MPSC देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सारखी निष्क्रिय झाली आहे का? असा प्रश्न देखील मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला आहे.

Updated : 17 Jan 2022 10:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top