Home > News > दाऊदच्या हस्तकासोबत अमृता फडणवीस यांचा फोटो, मनिषा कायंदेंचे ट्वीट व्हायरल

दाऊदच्या हस्तकासोबत अमृता फडणवीस यांचा फोटो, मनिषा कायंदेंचे ट्वीट व्हायरल

"मुंबई हल्ल्याचा आरोपी दाऊदचा माणूस - युसुफ लकडावाला. आणि या बाई कोण हे काही सांगायला हवे का? लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे? आता यांना कोणता न्याय लावावा?'' डाॅ. मनीषा कायंदे यांनी युसुफ लकडावालासोबत अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करत साधला निशाणा

दाऊदच्या हस्तकासोबत अमृता फडणवीस यांचा फोटो, मनिषा कायंदेंचे ट्वीट व्हायरल
X

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मुद्द्यांवरून गदारोळ सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.या सगळ्या प्रकरणांमध्ये गाजत असलेलं एक प्रकरण म्हणजे युसुफ लकडावाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला कडून 80 लाखांचे कर्ज घेतले असल्याचा दावा राऊत यांनी केला त्यानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली. २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने युसूफ लकडावालाला अटक केली होती. त्यानंतर लॉकअपमध्य असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून संजय राऊत यांनी टीका केली होती. युसूफच्या संपत्तीच्या काही भाग अजूनही नवनीत राणांकडे आहे मग ईडी नवनीत राणांना चहा प्यायला कधी बोलावणार? असा सवाल संजय राऊतांनी विचारला होता.

आता संजय राऊत यांच्या ट्विट नंतर शिवसेनेच्या नेत्या डाॅ. मनीषा कायंदे यांनी एक ट्विट केले आहे. मनीषा कायंदे यांनी युसुफ लकडावालासोबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करत निशाणा साधला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, "मुंबई हल्ल्याचा आरोपी दाऊदचा माणूस - युसुफ लकडावाला. आणि या बाई कोण हे काही सांगायला हवे का? लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे? आता यांना कोणता न्याय लावावा?'

Updated : 1 May 2022 2:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top