Home > News > अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांची निवड

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांची निवड

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी खासदार राहूल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांची निवड
X

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, खासदार राहूलगांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात युवकांना संधी देवून राष्ट्रकार्यात समाविष्ठ करण्याचे धोरण अवलंबले असून यानुसारच ॲड. यशोमती ठाकूर यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारणीत काम करण्याचा बहुमान मिळाला आहे.

ॲड. यशोमती ठाकूर या सन 2009 पासून आमदार म्हणून कार्यरत आहेत. सलग ३ निवडणुका जिंकुन त्यांनी आपल्या विधायक कार्याचा ठसा उमटविला आहे. युवकांच्या शिक्षणापासून ते रोजगारापर्यंतच्या कामात त्या सातत्याने कार्यरत असतात. महिला आमदार म्हणून युवतींच्या, महिलांच्या समस्यांना वाचा फोडणे व शासनाकडून त्यांचे निराकरण करण्याचे काम त्या अहोरात्र करीत आहेत.

महाराष्ट्रातील गरीब,असंघटीत कामगार, सफाई कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेत मजूर, निराधार, दिव्यांग, अपंग, अंध, विधवा, परितक्त्या, असाध्यरोगग्रस्त, भटके विमुक्त, निराश्रीत, उपेक्षित, अन्यायग्रस्त, कुष्ठरोगी, आदिवासी या वर्गातील नागरीकांना व त्यांच्या कुटुंबायांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करून त्यांचे जिवनमान उंचाविण्याचे, त्यांच्या जिवनात सुख-समृध्दी सुरक्षितता निर्माण करण्याचे व गरीबांचे जिवन आनंदी करण्याचे महत्वपूर्ण व कसोटीचे काम आमदार ॲड. यशोमती ठाकूर या सातत्याने करीत असून शासकीय चौकट व मर्यादा भेदून गोर-गरीबांना मदत पोहोचविण्याचे कौशल्य त्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून व प्रचंड मेहनतीने साध्य केल आहे. कर्तत्वदक्ष आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या याच प्रामाणिक कार्याची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची व योगदान देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोपविली आहे.

Updated : 20 Aug 2023 10:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top