Home > News > मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेतील 17 सुंदरींना कोरोनाची लागण …

मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेतील 17 सुंदरींना कोरोनाची लागण …

मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेतील 17 सुंदरींना कोरोनाची लागण …
X

मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेचा ग्रँड फिनाले इव्हेंट कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मानसा वाराणसी हिच्यासह १७ स्पर्धक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या सर्वांना आता पोर्तो रिकोमध्ये अलगीकरनात ठेवण्यात आले आहे. वास्तविक, प्वेर्तो रिकोमधील हा कार्यक्रम आज भारतीय वेळेनुसार पहाटे ४.३० वाजता होणार होता, परंतु कोरोनामुळे तो आता पुढील काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या ९० दिवसांत याच ठिकाणी मिस वर्ल्ड स्पर्धा होणार असल्याचे आयोजकांनी म्हंटले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर सर्व सौंदर्यवतींना घरी परतण्याची परवानगी दिली जानार आहे.

Updated : 18 Dec 2021 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top