Home > News > हिजाब च्या मुद्दयावर मिस युनिवर्स हरणाज कौरच्या प्रतिक्रेयेने अनेकांची बोलती बंद

हिजाब च्या मुद्दयावर मिस युनिवर्स हरणाज कौरच्या प्रतिक्रेयेने अनेकांची बोलती बंद

हिजाब च्या मुद्दयावर मिस युनिवर्स हरणाज कौरच्या प्रतिक्रेयेने अनेकांची बोलती बंद
X

मिस युनिव्हर्स हरणाज कौर सिंधू या मुंबईमध्ये आल्यानंतर त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या. या वेळी एका पत्रकाराने हिजाब बाबत तुमचं मत काय? असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच त्या ठिकाणी असणाऱ्या समन्वयकांनी त्यांना राजकीय प्रश्न न विचारण्याची विनंती केली. पत्रकाराने त्यांना हरणारजला बोलू देण्यास सांगितले मात्र पुन्हा त्यांच्याशीच हुज्जत घालत समन्वयकांने विषय बदलण्याचा प्रयत्न केला त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने "तुम्ही हे का बोलता हे तुमचं काम नाही त्यांना बोलू द्या" असं म्हणत हरणाज कौर सिंधू यांना बोलण्यासाठी भाग पाडले. मग यावेळी मात्र हरणाजने सडेतोड उत्तर दे त्यांनी अनेकांचे तोंड बंद केले. "नेहमी तुम्ही मुलींनाच टारगेट का करता? आता पण तुम्ही मलाच टार्गेट करत आहात. मुलीं ज्याप्रकारे जगू इच्छितात त्या प्रकारे त्यांना जगू द्या, मुलींना भरारी घेउद्या मुलींचे पंख छाटू नका" असं उत्तर देताच मग त्याठिकाणी टाळ्यांचा कडकडाट झाला.

आता हिजाब प्रकरणातच कोर्टाने निर्णीय दिला असताना वारंवार हाच मुद्दा चघळत राहायचं. त्यामुळे मुस्लिम महिलांना हिजाब प्रकरणावरून टार्गेट केले जातं आहे का? हिजाब मुद्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला जातो आहे का? असे अनेक प्रश्‍न आता सर्वांसमोर उभे आहेत.

मागच्या काही दिवसांमध्ये हिजाबवरून राज्यात आणि देशात खूप मोठा वाद सुरु होता. कर्नाटकातील एका प्रकारानंतर सोशल मीडिया पासून राजकीय वर्तुळात ही चर्चा होती. शाळांमध्ये धार्मिक कपडे परिधान करून मुलांनी जावं की जाऊ नये? यावरून मोठा गदारोळ सुरू होता. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय दिला आणि सध्या या निर्णया विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पण हे प्रकरण काही केल्या शांत झालं नाही पाहिजे या हेतूने आज अनेक प्रयत्न सुरू आहेत का?

Updated : 27 March 2022 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top