अल्पवयीन मुलासह दोघांचा चिमुरडीवर बलात्कार
Admin | 29 Sep 2021 4:36 AM GMT
X
X
एका व्यवसायीक महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच सिन्नर तालुक्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका चिमुरडीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील घरी नसल्याचा फायदा घेत आरोपींनी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घरी आणि शेतात नेऊन बलात्कार केला. त्यांनतर आणखी एका अल्पवयीन आरोपीने देखील या मुलीवर अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी मुलीला देण्यात आली होती.
मात्र घाबरलेल्या मुलीनी आई-वडिलांना सर्व हकीकत सांगितली त्यांतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून,दुसरा आरोपी फरार आहे. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
Updated : 2021-09-29T10:07:16+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire