Home > News > ...आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला सॅल्यूट मारला

...आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला सॅल्यूट मारला

...आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला सॅल्यूट मारला
X

पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहतच असतो. मात्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज चक्क आपल्या वाहन चालकाला सॅल्युट मारला आहे. तसेच या कर्मचाऱ्याचे औक्षण करून शाल व श्रीफळ देत त्यांचा सत्कार सुद्धा केला.

मारुतीराव कीन्हाने असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, कीन्हाने 1989 साली पोलीस दलात सेवत आहेत. तर गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत असतात. मात्र मारुतीराव यांची आज सेवानिवृत्ती आहे.

त्यामुळे कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचं औक्षण करून तसेच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव ठाकूर यांनी केला. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना ठाकूर यांनी चक्क सॅल्यूट केला तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

Updated : 31 July 2021 6:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top