Home > News > राष्ट्रीय बाल पूरस्कार विजेत्या जिया रायचा मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला सत्कार!

राष्ट्रीय बाल पूरस्कार विजेत्या जिया रायचा मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला सत्कार!

राष्ट्रीय बाल पूरस्कार विजेत्या जिया रायचा मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला सत्कार!
X

विश्वविक्रमी पॅरा स्विमर जिया राय हिला केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पूरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्याबद्दल राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिचा सत्कार केला. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचंदेखील त्या म्हणाल्या.

जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम केला आहे. जियाला ऑटिझम आहे, तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे. अवघ्या तेरा वर्षांच्या जियाने विश्वविक्रम केला आहे.


मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, पालकांनी आपल्या मुलांमध्ये काय कमी आहे, हे न पाहता ते काय करू शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे. जियाच्या या यशात तिच्या पालकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचाही सत्कार आणि अभिनंदन मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले. जियाला भविष्यात जी काही मदत लागेल त्याबाबत शासन म्हणून आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी असू, असे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. या सत्कार समारंभास जियाचे वडील मदन राय आणि आई रचना राय उपस्थित होते.

Updated : 3 Feb 2022 9:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top