मंत्री यशोमती ठाकूर यांनी दत्तक घेतलेली पायल अडकणार विवाह बंधनात
Max Woman | 9 Jun 2021 2:30 PM IST
X
X
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या पायल रडके या मुलीचा आता विवाह होत आहे. पायल ही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. रामा गावात राहणाऱ्या पायलच्या आई आणि वडिलांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर अनाथ झालेल्या पायलचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी यशोमती ठाकूर यांनी घेतली होती. आता पायल मोठी झाली असून ती लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
कोरोना संकटात अनेक बालकांचे आई-वडिल किंवा एका पालकाचे निधन झाल्याने ते अनाथ झाले आहेत. अशा मुलांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सरकारने या मुलांसाठी मदतीची योजनाही जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी अनेक दिवसांआधीच अनाथ झालेल्या मुलीची जबाबदारी घेत सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे.
Updated : 9 Jun 2021 2:30 PM IST
Tags: Yashomati Thakur payal
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire