Home > News > पापा की परी सुहानी शाह पडली बागेश्वर बाबा वर भारी

पापा की परी सुहानी शाह पडली बागेश्वर बाबा वर भारी

पापा की परी सुहानी शाह पडली बागेश्वर बाबा वर भारी
X

बागेश्वर नाथ धाम (Bageshwar Dham) चा धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. तर दुसरीकडे सुहानी शाह ही माइंड रीडरही (Mind Reader) चर्चेत आहे. दुस-या मनातील गोष्ट ओळखण्यात सुहानी तरबेज आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली सुहानी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटिज् सोबत दिसत असते. सध्या सर्वच प्रमुख माध्यमांच्या डिबेटमध्ये सुहानी माइंड रीडर हे शास्त्र असून कुठलीही जादू नसल्याचं सांगत बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीचा (Dhirendra Krishna Shastri) पर्दाफाश करत आहे.

माइंड रीडिंग कुठलाही चमत्कार नाही

सुहानी शहा म्हणते, माइंड रीडिंग करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. त्याचा वापर केल्यावर आपल्याला तो चमत्कार वाटतो. सुहानी माइंड रीडिंग करते, त्याला कित्येकदा लोकांनी चमत्कारी शक्ती म्हटलं. मात्र, सुहानी लोकांना सांगते की, हा चमत्कार नसून माइंड रीडिंगचं शास्त्र आहे.

माइंड रीडिंग करतांना संबंधित व्यक्ती त्यावेळी कुठल्या परिस्थितीत आहे. त्यावेळी तो कुठला विचार करत असेल, याविषयी माइंड रीडिंग करणा-या व्यक्तीला त्याचा अभ्यास करावा लागतो. याशिवाय त्या व्यक्तीच्या सभोवतालची परिस्थिती बघूनही बराच अंदाज येतो. लोकं या माइंड रीडिंगलाच चमत्कार समजू लागतात आणि अंधश्रद्धेला बळी पडतात, असंही सुहानी सांगते.

सुहानी शहा ही व्यावसायिकरित्या माइंड रीडर आहे. माइंड रीडिंगविषयी सुहानीनं अनेक व्हिडिओ बनवले आहेत. राजस्थान मध्ये जन्मलेल्या सुहानीचं शिक्षण गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये झालं, तिथंच तीच बालपणही गेलं. Youtube वर सुहानी लोकप्रिय आहे. सुहानीचे अनेक व्हिडिओ वायरल झालेले आहेत. सुहानीनं माइंड रीडिंगवर अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. सुहानी लोकांना मोटिवेटही करते. सुहानीनं माइंड रीडिंग तिच्या वडिलांकडून शिकली आहे.

Updated : 24 Jan 2023 6:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top