Home > News > मिलींद सोमण यांच्या 'त्या' फोटो शूटला पत्नीचा पाठिंबा

मिलींद सोमण यांच्या 'त्या' फोटो शूटला पत्नीचा पाठिंबा

मिलींद सोमण यांच्या त्या फोटो शूटला पत्नीचा पाठिंबा
X

फिटनेस गुरु मिलिंद सोमण यांनी 4 नोव्हेंबर रोजी आपल्या 55 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या तंदुरुस्तीकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नग्न अवस्थेत धावताना दिसला. या फोटोशूटमुळे मिलिंदवर एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणावर आता मिलिंद यांची पत्नी अंकिता कोंवर यांनी पाठिंवा दिला आहे.

अंकिता कोंवर यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून या फोटोमध्ये अंकिताने पांढऱ्या रंगाचा स्विमिंगसूट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत अंकिताने 'मला नेहमीच अभिमान आहे' या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. या पोस्टद्वारे अंकिताने पतीला पाठिंबा दिला असल्याचे म्हटले जात आहे.

https://www.instagram.com/p/CHRzd07FFcv/?utm_source=ig_web_copy_link

Updated : 2020-11-09T19:22:44+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top