Home > News > यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू

यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू

यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू
X

अमेरिकेच्या मुंबईतील कॉन्सुल जनरल पदाचा कार्यभार माईक हॅन्की यांनी स्वीकारला आहे .मुंबईत येण्यापूर्वी, कॉन्सुल जनरल हॅन्की यांनी अम्मानमधील यूएस दूतावासात डेप्युटी चीफ ऑफ मिशन म्हणून काम केले आहे. त्याआधी त्यांनी जेरुसलेममधील यूएस दूतावासात पॅलेस्टिनी व्यवहार युनिटचे प्रमुख म्हणून काम केले.

माईक हॅन्की यांची राजकीय कारकीर्द ही 2001 पासून सुरू झाली यांनी सौदी अरेबिया ,इराक, येणे, नायजेरिया ,इजिप्त इथे सुद्धा काम केल आहे. माइक यांचं कुटुंब भारतात रवाना झालं आहे .त्यांची पत्नी आणि दोन मुले असं त्यांचं कुटुंब आहे.

या नियुक्तीनंतर बोलताना हॅन्की म्हणाले की "जेव्हा अमेरिका-भारत संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत अशा वेळी पश्चिम भारतामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे प्रतिनिधित्व करण्याचा मला सन्मान वाटतो. आम्ही राजनैतिक संबंधांची 75 वर्षे साजरी करत असताना, लोकशाही मूल्यांसाठी आर्थिक भागीदारी देण्यासाठी दोन्ही देश कटीबद्ध आहेत .आम्ही अधिक समृद्ध, मुक्त, जोडलेले आणि सुरक्षित जग तयार करण्यासाठी कार्य करत राहू.. येत्या तीन वर्षात मुंबई आणि पश्चिम भारताला कलात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जे काही ऑफर करायचे आहे ते शोधण्यासाठी मी उत्सुक आहे," असे माईक हॅन्की म्हणाले.

Updated : 9 Aug 2022 12:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top