Home > News > मिया बिवी राझी तो क्या करेगा हायकोर्ट

मिया बिवी राझी तो क्या करेगा हायकोर्ट

मिया बिवी राझी तो क्या करेगा हायकोर्ट
X

हेडींग वाचून बावचळू नका लोकहो कारण विषयच तसा हार्ड आहे. तर घटना आहे पुण्यातली त्या दोघांचं 20 वर्षापुर्वी लग्न झालं. नवरा डॉक्टर तर बायको मायक्रो बायोलॉजीस्ट कोरोनाआधी सर्व काही आनंदीआनंद होतं पण कोरोना आला यांच्या नात्यालाही संसर्ग लागला. मग काय रोज भांडणं.. शेवटी पत्नी ने डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल केला FIR झाला. आणि जेव्हा पत्नीला आपली चूक कळली तेव्हा हा FIR मागे घेण्यासाठी हायकोर्टात याचिका करण्यात आली. या याचिकेवरुन न्यायमुर्तीही म्हणाले "मिया बिवी राझी" आणि हा FIR मागे घेण्यात आला.

नवरा डॉक्टर असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असताना मार्च एप्रिलच्या काळात 18 तास ड्युटी बजावत होता. नवरा वेळ देत नसल्याने त्या दोघांत गैरसमजुतीतून मतभेद झाले. आणि पत्नीने पती विरोधात कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी दाखल केलेल्या याचीवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी पत्नीने आपण पती सोबतच रहाणार असल्याचं मान्य केलं. या दोघांना दोन मुलंही आहेत.

या दोघांनी सोबत रहाण्याचं मान्य केल्यानंतर न्यायालयानेही समाधान व्यक्त केलं. सुनावणीवेळी न्यायमूर्ती कर्णिक यांनी मिया बिवी राझी म्हणत दोघांनाही वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated : 26 Nov 2020 6:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top