Home > News > Business News : इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही मिळणार पेड ब्लू टिक.. । | Tech auto marathi news

Business News : इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही मिळणार पेड ब्लू टिक.. । | Tech auto marathi news

Business News : इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही मिळणार पेड ब्लू टिक.. ।  | Tech auto marathi news
X

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरनंतर मेटाने इंस्टाग्राम (instagram) आणि फेसबुकवरही (Facebook) पेड ब्लू टिक सेवा सुरू केली आहे. आता कोणताही इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरकर्ता त्याच्या प्रोफाईलवर ब्लू टिक लावू शकतो, यासाठी त्याला काही शुल्क आकारले जाणार आहे. (instagram, Facebook Blue Tick Paid Service Update)

वेबवर साइन अप करणार्‍या वापरकर्त्यांना फक्त Facebook वर ब्लू टिक्स मिळतील, तर मोबाईल अॅप वापरकर्त्यांना Facebook आणि Instagram या दोन्हींसाठी ब्लू टिक्स मिळतील. आजपर्यंत आपण पाहत होते मोठ्या सेलिब्रिटींना अशा प्रकारचे Blue Bach दिसत होते. आता तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक पण अशा प्रकारचा ब्लू टिक आपल्या प्रोफाइल घेऊ शकतो..

मोबाइलवर दरमहा 1 हजार 237 रुपये भरावे लागतील..

कंपनीने सध्या ही सेवा अमेरिकेत सुरू केली आहे, लवकरच ही सेवा इतर देशांमध्येही सुरू होणार आहे. वापरकर्त्यांनी वेबवर साइन अप केल्यास या सेवेची किंमत प्रति महिना $11.99 (रु. 989) किंवा त्यांनी मोबाईल अॅपद्वारे साइन अप केल्यास $14.99 प्रति महिना (रु. 1. हजार 237) आहे.

ट्विटर पेड ब्लू टिक सेवेला सुरवात केली..

ब्लू टिकची सेवा सर्वप्रथम ट्विटरने सुरू केली होती, जी केवळ लोकप्रिय लोकांसाठी राखीव होती. इंस्टाग्रामने यापूर्वी मीडिया संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांना, प्रभावशाली व्यक्तींना, सेलिब्रिटींना आणि राजकारण्यांना त्यांच्या नावापुढे ब्लू टिक लावण्याची परवानगी दिली होती. आता कोणताही वापरकर्ता ते खरेदी करू शकणार आहे.

ब्लूटिक कोणाला मिळेल आणि प्रक्रिया काय आहे..

इंस्टाग्रामवर ब्लू टिक्स खरेदी करण्यासाठी, वापरकर्त्याचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे, त्यांचा फोटो आयडी सबमिट करणे आणि त्यासाठी आखून दिलेली प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मेटा वर एकदा वापरकर्त्याची पडताळणी झाल्यानंतर, त्याला त्याचे प्रोफाईल नाव किंवा डिस्प्ले नाव किंवा प्रोफाइलवरील इतर कोणतीही माहिती बदलणे सोपे असणार नाही. असा काही बदल केला तर वापरकर्त्याला पुन्हा पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल. मीडिया रिपोर्ट्नुसार, ज्या वापरकर्त्यांना आधीपासूनच Instagram आणि Facebook वर ब्लू टिक आहे त्यांना Meta च्या सशुल्क ब्लू टिकयोजनेसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.

Updated : 20 March 2023 1:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top