Home > News > मासिकपाळीचे कॉमिक्स बनवलं ,आज आहे 'फोर्ब्स' यादीत नाव

मासिकपाळीचे कॉमिक्स बनवलं ,आज आहे 'फोर्ब्स' यादीत नाव

मासिकपाळीचे कॉमिक्स बनवलं ,आज आहे फोर्ब्स यादीत नाव
X

Menstrupedia च्या सह-संस्थापक अदिती गुप्ता ही भारतीय महिला उद्योजकांपैकी एक आहे जी एक लेखिका आणि कॉमिक मेन्स्ट्रूपीडियाची सह-संस्थापक आहे. मासिक पाळीबद्दल असणारे गैरसमज आणि चुकीच्या माहितीला कंटाळून तिने बदल करण्याचा निर्णय घेतला.

तिने आणि तिच्या पतीने 2012 मध्ये कॉमिकची सह-स्थापना केली. 2014 मध्ये तिचा फोर्ब्स इंडियाच्या 30 वर्षांखालील 30 च्या यादीत समावेश सुद्धा झाला. आज, मासिक पाळीच्या या कोमिक्सचा वापर 6,000 हून अधिक शाळांमध्ये केला गेला आहे आणि 14 पेक्षा जास्त भाषांमध्ये 10,00,000 पेक्षा जास्त मुलींना त्याचा फायदा झाला आहे.

अदिती ही भारतातील एक सामाजिक महिला उद्योजिका आहे जी मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करते. ती एक टेड टॉक स्पीकर सुद्धा आहे

मासिकपाळीबद्दल बरेच गैरसमज दूर करण्याचं काम आदिती करत आहे आणि त्यामुळेच एक बिझनेस वुमन सोबतच महिलांना नवीन विचार करण्यास भाग पाडते. कारण पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे . अदिती गुप्ता यांनी मासिक पाळीसारख्या विषयावर मेनस्ट्रुपीडिया कॉमिक तयार करून ते अवघड काम सोपे केले आहे, ज्यावर भारतातील मुली आणि स्त्रिया बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.त्यामुळे चुकीची माहिती आणि गैरसमज यामुळे महिलांना त्रास होणार नाही याची काळजी घेणारं मेन्स्ट्रुपेडिया हे कॉमिक्स इतकं प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरले आहे.

Updated : 16 Feb 2023 9:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top