देशाने गेल्या ११ महिन्यांत कोरोना माहामारीमुळे अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर, आता देशाची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. हैद्राबादच्या भारत बायोटेकने बनलेल्या कोवेक्सीन आणि पुण्याच्या सिरम इंस्टीट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड या दोन लसींना केंद्र सरकाने मंजुरी दिल्यानंतर उद्या देशभरातील आरोग्य कर्मचारी तसेच महत्वाच्या सेवेत काम करणाऱ्या लोकांना ही लस देण्यात येणार आहे.
उद्या होणाऱ्या लसीकरणाच्या मेगा ड्राईव्हसाठी केंद्र सरकार सज्ज झालं असून कोवेक्सीन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसींचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणा संबंधित लोकांमध्ये अनेक अफवा आहेत. या सर्व अफवांचे निर्मूलन करण्यासाठी उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे शनिवारी देशातील जनतेशी संवाद साधणार आहे. कोरोना लसीकरणाबद्दल असलेल्या विविध अफवांवर ते भाष्य करणार आहेत.
शनिवारी म्हणजेच उद्या सकाळी ठिक १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाच्या मेगा ड्राईव्हला सुरूवात होईल. कोरोना लसीकरणाच्या सुरूवातीबरोबरच या लसीची उपलब्धता आणि इतर माहीती देण्याऱ्या वेगळ्या डिजीटल प्लॅटफॉर्मचं लोकार्पण सुद्धा करण्यात येणार आहे.
कोरोना लसीकरणाची ही पहिली मेगा ड्राईव्ह देशभरातील १२ मुख्य शहरांत होणार आहे. उद्या देशाच्या भविष्याच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा दिवस असल्याने ज्या ज्या ठिकाणी कोरोनाच्या लसी ठेवण्यात आल्या आहेत, आणि ज्या ज्या ठिकाणी कोरोना लसीकरणाची मेगा ड्राईव्ह होणार आहे, त्या त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.