Home > News > MC Stan बजरंग दलाला का खुपतोय? बजरंग दलाच्या धमकीला फॅन्सचे उत्तर..

MC Stan बजरंग दलाला का खुपतोय? बजरंग दलाच्या धमकीला फॅन्सचे उत्तर..

MC Stan बजरंग दलाला का खुपतोय? बजरंग दलाच्या धमकीला फॅन्सचे उत्तर..
X

बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन भारत दौऱ्यावर आहे. एमसी स्टॅन देशभरातील विविध शहरांमध्ये शोचे आयोजन करत आहे. त्याच्या कार्यक्रमाला सहसा प्रचंड गर्दी दिसून येते. पण, 17 मार्चला इंदूरमध्ये झालेल्या विरोधानंतर त्यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आला. इंदूरमध्ये एमसी स्टॅनच्या शोला नागपुरातील बजरंग दलाच्या आंदोलकांनी विरोध केला. बजरंग दल MC Stan ला विरोध का करतंय? या विरोधाला MC Stan च्या फॅन्सनी काय उत्तर दिलं आहे पहा..

गाण्यात शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचा आरोप

बजरंग दलाच्या आंदोलकांचा शोमध्ये आंदोलनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने रॅपरचे गाणे असभ्य असल्याचे सांगून शो रद्द करण्याची तक्रार नागपूर पोलिसांकडे केली होती. 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) विजेता एमसी स्टॅनच्या (MC Stan) लाईव्ह कॉन्सर्टचे देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने 'इंडिया टूर'चं आयोजन केलं आहे. त्याअंतर्गत तो देशभरातील विविध शहरांमध्ये जाऊन आपल्या रॅप शोचं आयोजन करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने इंदूरमध्ये 'बस्ती का हस्ती' शोच्या विरोधात तक्रार केली होती आणि शो रद्द करण्याची मागणी केली होती. यानंतर, कॉन्सर्ट सुरू होण्याच्या अवघ्या एक तास आधी शो रद्द करण्यात आला.

बजरंग दलाचा विरोध का?

17 मार्चला एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे इंदूरमध्ये आयोजन करण्यात आले होते. दरम्यान याच कार्यक्रमादरम्यान बजरंग दलाने विरोध दर्शवला. एमसी स्टॅन त्याच्या गाण्यात शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला. तसेच तो त्याच्या गाण्यात ड्रग्जला प्रोत्साहन देतो असेही दलाचे म्हणणे आहे. त्यामुळेच बजरंग दलाने एमसी स्टॅनचा लाईव्ह कार्यक्रम बंद पाडला आहे.

चाहते सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवत आहेत..

शो रद्द झाल्यानंतर रॅपर एमसी स्टेनचे चाहते त्याच्या समर्थनात आले आहेत. अभिनेत्री संबुल तोकीर खाननेही एमसी स्टेनचा शो रद्द करण्यावर आक्षेप घेतला आहे. विरोधादरम्यान सोशल मीडियावर चाहते 'पब्लिक स्टँड्स विथ एमसी स्टॅन' ट्रेंड करत आहेत.


Updated : 19 March 2023 4:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top