Home > News > धाय मोकलुन रडणा-या भाजपच्या ताई आज कुठेय?

धाय मोकलुन रडणा-या भाजपच्या ताई आज कुठेय?

धाय मोकलुन रडणा-या भाजपच्या ताई आज कुठेय?
X

मुंबईच्या बोरीवलीत भाजप पदाधिकाऱ्यांने त्यांच्याच पक्षातील महिला नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरून आता शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर निशाणा साधत धाय मोकलुन रडणा-या भाजपच्या ताई आता कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पेडणेकर म्हणाल्यात की, भाजपच्या तायांचा फोन आज सकाळपासून बंद आहे. भाजपच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार का?, भाजपच्याच कार्यालयात महिलेला छळलं जातं, मारहाण होते. यांच्या दिव्याखालीच अंधार असल्याचा टोला पेडणेकर यांनी लगावला.

तसेच मी स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार आणि पोलिस स्टेशनला जाणार असल्याच सुद्धा त्या म्हणाल्या. केवळ महाराष्ट्र बदनाम करण्याचं काम भाजपकडून होत आहे. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमीका घेतली पाहिजे, मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं असे पेडणेकर म्हणाल्या. तर आज महिलांच्या विषयावर धाय मोकलुन रडणा-या भाजपच्या ताईंचा फोन सकाळपासूनच स्विच ऑफ, त्यांच्या पक्षातील कुणीच याबाबत बोलायला तयार नाही, असेही पेडणेकर म्हणाल्या.

Updated : 23 Sep 2021 8:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top