Home > News > कोरोना रणरागिणींचा गौरव, मॅक्स वुमन आणि महिला बालविकास विभागाचा उपक्रम

कोरोना रणरागिणींचा गौरव, मॅक्स वुमन आणि महिला बालविकास विभागाचा उपक्रम

कोरोना रणरागिणींचा गौरव, मॅक्स वुमन आणि महिला बालविकास विभागाचा उपक्रम
X

रोनाच्य़ा संकट काळात आपापल्या परिने गरजूंना मदत करण्यासाठी काही रणरागिणींनी आपल्या जीवाची परवा न करता समाजकार्य केले. आपल्याकडे जे आहे त्यामधून इतरांना मदत करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. याच संस्कृतीचे पालन करत राज्यातील काही रणरागिणींनी आपापल्या क्षेत्रातील कामाच्या व्यापातून वेळ काढत गरजूंना लॉकडाऊनच्या काळात मदत केली. या महिलांच्या याच कार्याची दखल घेत मॅक्स वुमन आणि महिला व बालविकास विभागातर्फे या कोरोना रणरागिणीचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते या हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन उपस्थित होत्या.

या रणरागिणींचा झाला गौरव

1. दुर्गा गुडीलू

दुर्गा गुडीलू आदिवासी वैदु समाजातील एक धडपडी मुलगी. दुर्गा यांनी केवळ स्मार्ट फोन नसल्याने मुलांचे भविष्य अंधारात राहू नये म्हणून मुंबई जोगेश्वरी पुर्वेला वैदू समाजाच्या वस्तीतील मुलांना एकत्र करुन शिकवण्यास सुरुवात केली. मुलांना पाठ्यपुस्तक शिक्षणा बरोबरच दुर्गाने योगा, नृत्यकला शिकवली. नावच दुर्गा असलेली ही बाई या आदिवासी मुलांसाठी सरस्वती बनली. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

2) कविता पाटील, पोलीस कॉन्स्टेबल

कॉंस्टेबल कविता पाटील मुंबईतील व्हि पी रोड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कवीता या लॉकडाउन काळात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अन्नपुर्णा तर त्यांच्या मुलांच्या 'यशोदा मैया' बनल्या. या महिलांच्या उत्पन्नाचे सर्वच रस्ते बंद झालेले असताना कविता यांनी स्वखर्चातून त्यांना जेवण दिलं. या महिलांना काही समस्या निर्माण झाली तर "ताई आमचा आधार आहेत" असं या महिला सांगतात. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
3) रिताताई सुखदेवे, सरपंच

काही गावांनी सुरूवातीपासूनच चांगल्या उपाययोजनांमुळं या गावांमध्ये कोरोना संसर्ग नाहीय. अशीच एक भंडारा जिल्ह्यातलं मानेगाव-झबडा ही गट ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत रिताताई सुखदेवे. रिताताई सुखदेवे यांनी अंगणवाडी सेविका, आरोग्य सविका आणि गावातील काही तरुणांना एकत्र करुन आपत्ती व्यस्थापन समिती तयार केली. या समिती मार्फत त्यांनी गावात जनजागृती, सॅनीटॅझेशन अशी कामं केली. रिताताईंच्या या प्रयत्नांमुळे आज गावात कोरोना नियंत्रण शक्य झालं व गाव सुरक्षीत आहे. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

4) दीपा परब, बाऊन्सर

कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात सर्वात जास्त होती. परिस्तिथीचे गांभीर्य पाहून स्वयंस्फूर्ती ने दीपा विविध सोसायटीमध्ये जाऊन सोडियम ह्यापोक्लोराईट ची फवारणी करायला पोहोचली. रुग्ण सापडल्या नंतर औषध फवारणी करण्यापेक्षा आधीच केली तर रुग्णसंख्या मर्यादित राहायला मदत होईल असा विचार करून दीपाने निर्धाराने कामाला सुरुवात केली. फवारणीचे यंत्र जे फक्त उचलणे देखील जड असते ते 3 -3तास आपल्या पाठीला लावून दीपा स्वतः दररोज वेगवेगळ्या भागात ही फवारणी मोफत करते आहे. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

5) नंदिनी दिवेकर, अंगणवाडी मदतनीस

कामाचा वसा घेतलेल्या नंदिनी दिवेकर या अंगणवाडी मदतनीस. नंदिनी या नववा महीना भरलेला असतानाही आपल्या वेदना बाजूला ठेवून जनजागृतीसाठी फिल्ड वर उतरल्या होत्या. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली या गावात त्या कोरोना संदर्भात कशी काळजी घ्यावी या बाबत गावकऱ्यांना माहिती देत असतानाच अचानक त्यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्याच वेळी त्यांच्या सोबतच्या अंगणवाडी सेविकेने त्यांना तात्काळ बोर्ली प्राथमिक आरोग्य केंदामध्ये दाखल केले व तिथे सुखरूपपणे त्यांची प्रसूती झाली. कोरोनामुळे आपल्याच माणसांजवळ जायला लोक घाबरत असतांना नंदिनी दिवेकर यांनी आपली आणि बाळाची पर्वा न करता गावकऱ्यांसाठी पुढाकार घेतला. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

6) मोनिका पानवे, अध्यक्षा, जिजाऊ सामाजिक संस्था

मोनीका पानवे या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा आहेत. मोनीका यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात एकूण ३० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यामध्ये ३००० बँग रक्त जमा करण्यात आले. डॉक्टर व पोलीस मित्रांना १२० PPE किट, फळे, मास्क, सॅनिटायसर फेस शिल्ड चे वाटप केले. विशेष म्हणजे त्यांच्या दिवसरात्र ८ रुग्णवाहिका कोकणात रुग्णांना आरोग्य सेवा पुरवत होत्या. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

7) विकी शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या

तृतीयपंथी म्हटलं की सर्वच नाकं मुरडतात.. त्यामुळे कोरोनामुळे जिथं आपल्याच माणसांजवळ जायला लोक घाबरत होती तिथं यांची काय बात.. अशा वेळी तृतीयपंथी समाजाच्या मदतीला आल्या त्या विकी शिंदे. विकी यांनी काही ओळखीच्या लोकांची मदत घेऊन मुंबईतील 700 तृतीयपंथी आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांना धान्य वाटप केलं. व त्यांना इतरही मदत पुरवली... कोरोनाने माणूसकी शिकवली असं विकी सांगतात. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.8 ) शर्मिला कलगुटकर, पत्रकार

कोरोनामुळे लॉडाऊन जाहिर करण्यात आलं. संपुर्ण देश घरी असताना लोकांना प्रत्येक घडामोडीची माहिती देण्यासाठी पत्रकार मात्र फिल्ड वर होते. काहिंनी तर स्थलांतरीत मजूर, गरिब कुटुंबांना मदत केली. अशाच पत्रकारांमध्ये शर्मीला कलगुटकर यांचाही समावेश होतो. या महामारिच्या काळातही स्वत:ची पर्वा न करता शर्मीला फिल्डवर उतरल्या. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

9) निर्मला बोलसरे, पर्यवेक्षिका

निर्मला बोलसरे बीट पर्यवेक्षीका. लॉकडाऊन काळात रोगप्रतिकार शक्तिच्या नावाने सगळेच चिंतेत होते. सर्वच जण वेगवेगळ्या प्रकारचे काढे पीत होते. अशा वेळी सर्वात महत्वाचा प्रश्न होता ते म्हणजे ग्रामीण भागातील गरोदर स्तनदा मातांचा व लहान मुलांच्या आरोग्याचा. अशा वेळी आपल्या जबाबदारीचं गांभीर्य ओळखुन निर्मला बोलसरे फिल्डवर उतरल्या. शासनाच्या अमृत आहार योजने मार्फत घरपोच डबे दिले, बालकांना अंडी शिजवून दिली. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

10) दयावंती मुनी, आरोग्यसेविका

कोरोनामुळे लॉडाऊन जाहिर झाल्यावर अनेक लोक शहरं सोडून गावाकडे स्थालांतरीत झाले. ही लोक शहरातून आल्याले त्यांच्यामुळे कोरोना पसरेल म्हणत घरातील लोकच त्यांना लांब करत होती. अशा वेळी शहरातून गावाकडे आलेल्या 40 लोकांच्या दयावंती मुनी आधार बनल्या. एवढंच नाही तर याच काळात दयावंती यांनी 27 महिलांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळऊन दिला. 91 जणांच्या रक्त चाचण्या केल्या तर 35 गरोदर मातांची सेवा केली. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.Updated : 12 Nov 2020 9:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top