Home > News > चैत्यभुमीवर `माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्हुयुईंग डेक`

चैत्यभुमीवर `माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्हुयुईंग डेक`

चैत्यभुमीवर `माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्हुयुईंग डेक`
X

चैत्यभूमी येथील दादर समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या व्ह्यूइंग डेकचे बुधवारी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने भारदस्त प्लॅटफॉर्म कार्यरत नसलेल्या स्टॉर्मवॉटर ड्रेन आउटफॉलवर बांधला आहे. या डेकवरुन समुद्राचे अखंड दृश्य दिसते.

हो बांधकाम किनाऱ्यापासून 16 फूट उंचीवर आहे आणि ती 1,500 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे. डेक 24-मीटर लांब आणि 20-मीटर रुंद आहे आणि त्यात शोभेचा प्रकाश आणि काही झाडे आहेत. डेक रात्रीच्या वेळीही लोकांसाठी उघडला जाईल आणि सुमारे 40 लोक एकावेळी उभे राहू शकतात. या प्रकल्पाची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे.

आज दादरमधील व्ह्युईंग डेकचे उद्घाटन केले. पावसाच्या पाणी समुद्रात सोडणाऱ्या वाहिनीवर ने सुंदर व्ह्युईंग डेक उभारला आहे. नागरिकांसाठी ओपन स्पेसचा कायापालट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चैत्यभूमी जवळील हा डेक "माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युईंग डेक" म्हणून ओळखला जाईल,असे ट्विट राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Updated : 9 Feb 2022 1:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top