Home > News > दिपाली सय्यद यांचा फडणवीस यांना विचीत्र सल्ला

दिपाली सय्यद यांचा फडणवीस यांना विचीत्र सल्ला

दिपाली सय्यद यांचा फडणवीस यांना विचीत्र सल्ला
X

गेल्या काही दिवसांपासून भाजप विरूध्द शिवसेना वाद संघर्षावर पोहोचला आहे. भाजप नेते या ना त्या मार्गाने शिवसेनेवर टीका करत असतात. यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही यात मागे राहीलेल्या नाहीत. शिवसेना विरूध्द राणा दांपत्या या हनुमान चालिसा पठणाच्या वादानंतर त्यांनी उध्दव ठाकरेंवर एकेरी भाषेत ट्विटरवर टीका केली होती.

या टीकेमुळे बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं होतं. त्यांच्या या ट्विट नंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी देखील अमृता फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना दावणीला बांधलेली म्हैस असा टोमणा मारला आहे. पत्रकारांना प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, "मी देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छिते की त्यांनी दावणीला बांदलेली म्हैस अशी वाऱ्यावर सोडू नये. ती वारंवार शिवसेने वर येतेय. शिवसेना शांत बसणाऱ्यातली नाही."

Updated : 1 May 2022 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top