Home > News > अग्रिमा जोशुआच्या समर्थनात मराठी अभिनेत्री केतकी चितळे मैदानात

अग्रिमा जोशुआच्या समर्थनात मराठी अभिनेत्री केतकी चितळे मैदानात

अग्रिमा जोशुआच्या समर्थनात मराठी अभिनेत्री केतकी चितळे मैदानात
X

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. शिवप्रेमींनी तिच्या व्हिडीओवर आक्षेप घेत अग्रिमा जोशुआवर टीका केली. मात्र आता अग्रिमा जोशुआच्या समर्थनात मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुढं आली आहे. केतकी चितळे हिने जोशुआची अक्कल ठीकाण्यावर आणण्याऱ्या मावळ्यांचीच अक्कल काढली आहे.

अग्रिमा जोशुआच्या समर्थनात केतकी ने फेसबूक पोस्ट लिहीली असुन यात तिने '‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा’ ! असं म्हटलं आहे.

इतकच नाही तर पुढे केतकी म्हणते की, ‘सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका’.

Updated : 11 July 2020 5:23 AM GMT
Next Story
Share it
Top