Home > News > 'ती' ऑडीओ क्लिप ऐकून मी सुन्न झाले : शेफाली वैद्य

'ती' ऑडीओ क्लिप ऐकून मी सुन्न झाले : शेफाली वैद्य

क्लब हाउस या सोशल मीडिया अॅपवर एका व्यक्तीने म्हटलं “मैं सेक्स के लिए हॉट संघियों को खोजता हूं” ऑडीओ ट्वीट करत शेफाली वैद्य म्हणतात “क्लिप ऐकून मी सुन्न झाले”

ती ऑडीओ क्लिप ऐकून मी सुन्न झाले : शेफाली वैद्य
X

क्लब हाऊस. एक ऑडिओ आधारित सोशल मीडिया अॅप आहे. यावर ग्रुप बनवले जातात आणि विवीध विषयांवर चर्चा केली जाते. इथं तुम्ही तुमच्या मनातलं बोलू शकता. सध्या या अॅपवरील अशाच एका गृप डिक्सशनची क्लिप व्हायरल झाली असून, त्यामुळे वाद निर्माण झालाय.

या चर्चेचा विषय होता 'आपण फक्त हॉट लोकांनाच डेट करतो का?', या चर्चेत निरज नावाचा एक व्यक्तीसुध्दा सहभागी झाला होता. त्याला हा प्रश्न विचारला असता त्याने उत्तर दिलं "मी सर्व प्रकारच्या लोकांशी डेट करतो. पण बर्‍याच वेळा मी डेटिंग अ‍ॅप्सवर हॉट संघी पोरांना शोधतो, केवळ सेक्ससाठी."

मग काय झाला ना बवाल, निरजच्या या उत्तरावर सर्वच हसले. पण कुणीतरी हा ऑडीओ लीक केला. हीच ऑडीओ क्लिप स्थंभ लेखिका शेफाली वैद्य यांनी ट्वीट केली असून, यात त्यांनी "हे संभाषण ऐकून मी सुन्न झाले. किती सहजपणे हा माणूस संघी महिलांबात हॉट सेक्स संदर्भात बोलतोय. आणि यावर स्वयंघोशीत फेमीनीस्ट देखील काही बोलत नाहीत." असं वैद्य ट्विट करत म्हणाल्या.

क्लिपमध्ये तो माणूस पेपर बॅग सेक्स हा शब्द वापरतो. यावर सगळे हसतात, पेपर बॅग सेक्स अमेरिकन स्लॅंग आहे. या लैंगिक कृत्यामध्ये जोडीदाराचा चेहरा आकर्षक नाही हे दर्शविण्यासाठी. कागदाच्या पिशवीने झाकलेला असतो. तर हेट सेक्स म्हणजे, हेट क्राइमबद्दल ऐकलं असेल. धर्म, जात, वंश आणि विचारधारेच्या आधारावर हिंसा करण्याला हेट क्राइम म्हटलं जातं. उदा - गोमांसांच्या नावावर दलित किंवा मुस्लिमांची मॉब लिंचिंग याच प्रकारात येतात. त्याच प्रकारे एखाद्याने द्वेषाच्या आधारावर सेक्ससाठी जोडीदाराचा शोध घेतला आणि सेक्सद्वारे त्याचा तिरस्कार दिसून आला तर त्याला हेट सेक्स म्हणातात.

दरम्यान, या वादार आता चर्चेत सहभागी असलेल्या व महिला अधिकार कार्यकर्त्या कुशा कपील यांनी ट्वीट करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये "तुम्ही ज्याच्याविषयी बोलत आहात. ते गे आहेत,त्यांनी वेगळ्या राजकीय विचारसरणीचे समलिंगी पुरुष शोधण्यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे. महिलांविरूद्ध काहीही बोलले गेले नाही."असं कुशा कपील म्हणाल्या आहेत.

Updated : 12 Jun 2021 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top