Home > News > महेंद्रसिंह धोनी च्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक

महेंद्रसिंह धोनी च्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक

महेंद्रसिंह धोनी च्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक
X

धोनीची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी गुजरातमधील कच्छमध्ये राहणारा आहे.

कोलकाता नाईट रायडर्सविरोधात पराभव झाल्यानंतर धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जवर सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेमध्ये एका व्यक्तीने धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली होती. पोलिसांनी अखेर आज या व्यक्तिला अटक केली आहे.रांचीमधील रातू रोड येथील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Updated : 12 Oct 2020 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top