Home > News > 'टाईम'च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ममता बॅनर्जींना स्थान

'टाईम'च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ममता बॅनर्जींना स्थान

टाईमच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ममता बॅनर्जींना स्थान
X

जगप्रसिद्ध टाईम मासिकाने दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा समावेश करण्यात आला आहे. टाईम मासिकाकडून 2021 या वर्षात जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकणाऱ्या 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवत विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील जवळपास संपूर्ण टिम भाजपने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मैदानात उतरवली होती. मात्र असे असताना ममतांनी भाजपला पश्चिम बंगालमध्ये एंट्री करू दिली नाही. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर टीएमसीचे वर्चस्व वाढले आहे. तर याचीच दखल घेत जगप्रसिद्ध टाईम मासिकाने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा समावेश केल

Updated : 16 Sep 2021 4:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top