Latest News
Home > News > दलित पँथरच्या अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांचा राजीनामा....

दलित पँथरच्या अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांचा राजीनामा....

दलित पँथरच्या अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांचा  राजीनामा....
X

दलित पँथर संघटनेच्या अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. याशिवाय दलित पँथरचे नवे अध्यक्ष म्हणुन त्यांनी रामभाउ तायडे यांची नियुक्ती केली.

गेल्या काही वर्षांपासुन दलित पँथरच्या अध्यक्षपदाचा कारभार मल्लिका नामदेव ढसाळ या पाहत होत्या. दलितांना वरील प्रश्न मांडण्याकरिता तसेच प्रश्न सोडविण्याकरिता दलीत पंथर कार्यरत असतो, मात्र तब्येतीच्या कारणामुळे त्या इथुन पुढे पँथरच्या राजकारणात सक्रिय राहू शकणार नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. परंतू पक्षश्रेष्ठी म्हणुन काही अधिकार स्वताःकडे ठेवल्याचे सांगायला त्या विसरल्या नाहीत.

यापुढील दलित पँथरचा सर्व कारभार नवनिर्वाचित अध्यक्ष रामभाऊ तायडे हे पाहणार आहेत. दलित पँथरच्या पुढील योजनांची माहिती येत्या १० ते १५ दिवसांत पत्रकार परीषद घेउन सांगणार असल्याचे रामभाऊ तायडेंनी सांगितले.

Updated : 18 Oct 2021 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top