मल्याळम चित्रपट अभिनेत्री सरन्या शसीने नऊ वर्षे कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर सोमवारी केरळच्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 35 वर्षांच्या होत्या. अत्यंत लोकप्रिय टीव्ही मालिकांमधून त्या घरोघरी पोहोचल्या होत्या त्यानंतर त्यांनी सुपरस्टार मोहनलाल आणि मल्याळम चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती.
2012 मध्ये एका टीव्ही सीरियलच्या शूटिंगदरम्यान त्या अचानक कोसळल्या होत्या त्यानंतर त्यांच्या मेंदूत एक गाठ असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आतापर्यंत त्याच्यावर 10 शस्त्रक्रिया केल्या होत्या. यातून बरे होत त्यांनी पुन्हा अभिनय करण्यास सुरुवात केली होती. परंतु त्या या आजाराशी दीर्घकाळ लढू शकल्या नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांना कोरोना देखील झाला होता. त्यातूनही त्या लगेच बऱ्या झाल्या होत्या. परंतु कर्करोगाशी त्या दीर्घकाळ लढू शकल्या नाहीत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सरन्या शशी यांच्या निधनाच्या बातमी नंतर दुःख व्यक्त केले आहे.