Home > News > नुकसानग्रस्त भागातील तात्काळ पंचनामे करा; आमदार नमिता मुंदडा यांची मागणी

नुकसानग्रस्त भागातील तात्काळ पंचनामे करा; आमदार नमिता मुंदडा यांची मागणी

नुकसानग्रस्त भागातील तात्काळ पंचनामे करा; आमदार नमिता मुंदडा यांची मागणी
X

राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची दखल घेत तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे. तर कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेत त्यांच्याकडे निवेदन देत मुंदडा यांनी वरील मागणी केली.

याबाबत माहिती देताना, नमिता मुंदडा यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे साहेब यांची आज मुबंईत भेट घेतली. भेटीदरम्यान केज,अंबाजोगाई या तालुक्यातील मांजरा नदीच्या काठालगत असलेल्या गावांतील काही शेतांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्वरित त्या पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी केली. शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याचे आदेश द्यावे. तसेच पीक विमा कंपनीस २५% जोखीम विमा रक्कम देण्याची अधिसूचना बीडचे मा.जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिली आहे. सदर विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी अशी विनंती त्यांना केली. मंत्री महोदयांनी माझ्या मागण्यांची दखल घेत कृषीसचिवांना फोन द्वारे संपर्क साधला. मी आजच मंत्रालयात कृषी सचिवांची भेट घेत पुढील कारवाई लवकरात लवकर करण्याची विनंती केली. कृषी सचिवांनी देखील सर्व कारवाई लवकरचं सुरू करू असे आश्वासन दिले," आस मुंदडा म्हणाल्यात.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्याला सुद्धा बसला आहे. मराठवाड्यातील एकूण 145 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

Updated : 10 Sep 2021 4:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top