Home > News > महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा वादात, महिला आयोगाचा आक्षेप

महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा वादात, महिला आयोगाचा आक्षेप

महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा वादात, महिला आयोगाचा आक्षेप
X

दिग्दर्शक महेश मांजरेकर पुन्हा एकदा एका नवीन वादात अडकले आहेत. सध्या त्यांचा नवीन सिनेमा सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा' हा नवीन सिनेमा प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. या सिनेमातील बोल्ड दृश्यांमुळे आणि डॉयलॉगमुळे हा सिनेमा आता वादत अडकला आहे. 'वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा' या सिनेमातील दृश्य आक्षेपार्ह असल्याने आता राष्ट्रीय महिला आयोगाने याला विरोध केला आहे. महिला आयोगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे याबाबत तक्रार केली आहे. सिनेमामध्ये महिलेचे पात्र आणि अल्पवयीन मुलांवर काही आक्षेपार्ह दृश्य चित्रित करण्यात आली आहे, ती काढून टाकण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला लहिलेल्या पत्रात केली आहे.

महेश मांजरेकर यांचा हा नवीन सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर २ दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे. याच ट्रेलरमधल्या दृश्यांवर आक्षेप घेण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाकडे काही जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

भारतीय स्त्री शक्ती या संघटनेने सिनेमातील दृश्यांवर आक्षेप घेतला आहे तसेच महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण यावर वयाचं कोणाचेही बंधन नसल्याने ते ट्रेलर सर्व वयोगटांना पाहाता येत आहे, असाही आक्षेप महिला आयोगानं केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात घेतला आहे. हा सिनेमा एक क्राईम थ्रीलर आहे. आता आयोगाने थेट भूमिका घेतल्याने सरकार काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 13 Jan 2022 11:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top