Home > News > '२०१४ नंतर भारतात अनेक क्षेत्रांमध्ये कमालीची घसरण' असं म्हणत मंत्री यशोमती ठाकुर यांची पंतप्रधानांवर टीका

'२०१४ नंतर भारतात अनेक क्षेत्रांमध्ये कमालीची घसरण' असं म्हणत मंत्री यशोमती ठाकुर यांची पंतप्रधानांवर टीका

२०१४ नंतर भारतात अनेक क्षेत्रांमध्ये कमालीची घसरण असं म्हणत मंत्री यशोमती ठाकुर यांची पंतप्रधानांवर टीका
X

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाद्वारे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते लहान मुलांसाठी PM Cares योजनेची सुरूवात केली गेली. याप्रसंगी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या आधीच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

यशोमती ठाकुर यांनी ट्विट करताना म्हटलंय, "मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारतम्य सोडलेलं दिसतंय. पीएम केअर्स फ़ॉर चिल्ड्रेन कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांशी बोलताना २०१४ च्या आधी गोंधळाची परिस्थिती होती अशा पद्धतीचं विधान हे देशातील तमाम राष्ट्रनिर्मात्यांचे या देशाच्या बांधणीतील योगदान नाकारण्यासारखे आहे. भारत २०१४ च्या आधी महान च होता, उलट २०१४ नंतर अनेक क्षेत्रांमध्ये कमालीची घसरण झालीय." असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

त्यांच्या या टीकेवर आता नेटकऱ्यांनीही प्रतिक्रीया देण्यास सुरूवात केली आहे. सचिन वाघमोडे या वापरकर्त्याने पंतप्रदान मोदींवर टीका करताना, "माणसाच्या मेंदूत काय टाकले म्हणजे आपले काम होईल हे जाणतात मोदी ....त्या लहान विद्यार्थ्यांना असे सांगितल्यावर त्यांनाही ते खरे वाटेल आणि तेही मोदींना अवतार समजतील. लय पुढचे प्लॅनिंग सुरू साहेबाचे.... खोट्या गोष्टी ठासून भरणे सुरू आहे.", अशी प्रतिक्रीया दिली आहे.

तर विजय देशमुख या वापरकर्त्यांनी यशोमती ठाकुर यांच्या ट्विटला दुजोरा देत, "त्यांच्या कडून दुसरी अपेक्षा काय करू शकतो. आपण..... मला तर त्यांना मते देणाऱ्यांची कीव येते.... अजूनही", असं म्हटलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

तर अमोल दांदडे या वापरकर्त्याने पंतप्रधानांना या वक्तव्यावर राष्ट्रीय स्तरावर प्रित्युत्तर दिलं पाहिजे असं म्हटलं आहे. "याला राष्ट्रीय स्थरावर प्रत्युत्तर गेले पाहिजे. विरोधकांच्या शांततेचा जनता वेगळा अर्थ लावते.", अशी अपेक्षा या वापरकर्त्याने व्यक्त केली आहे.

आता पंतप्रधान नरेंदेर मोदींच्या या विधानाला राष्ट्रीय स्तरावर विरोध केला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 30 May 2022 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top