Home > News > राज्यात एकाच दिवसात ६३ हजार २९४ नवीन रुग्ण..

राज्यात एकाच दिवसात ६३ हजार २९४ नवीन रुग्ण..

राज्यात एकाच दिवसात ६३ हजार २९४ नवीन रुग्ण.. पाहा तुमच्या जिल्ह्यातील रुग्णाची स्थिती?




राज्यात एकाच दिवसात ६३ हजार २९४ नवीन रुग्ण..
X

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. आज राज्यात ६३ हजार २९४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर ३४ हजार ००८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज राज्यात कोरानाने ३४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . सध्या महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर १.७% एवढा आहे. 


राज्यात आजपर्यंत एकूण २७,८२,१६१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.६५% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२१,१४,३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी • ३४,०७,२४५ (१५.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३१,७५,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Updated : 11 April 2021 6:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top