Home > News > "शेवटी कावीळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं" Mrs. फडणवीसांवर चाकणकरांची खोचक टीका

"शेवटी कावीळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं" Mrs. फडणवीसांवर चाकणकरांची खोचक टीका

शेवटी कावीळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं Mrs. फडणवीसांवर चाकणकरांची खोचक टीका
X

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मंदिरं उघडण्यावरून वादाची ठिणगी पडली. या वादात अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे.

"अमृता फडणीस यांनी महाराष्ट्रा संदर्भातील भूमिका आता बदलायला पाहिजेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गोव्याचे देखील राज्यपाल आहेत. त्यांनी गोव्यात देखील मंदिरात प्रवेशासाठी तिथल्या मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं आहे का? दोन राज्यांसाठी एक राज्यपाल असतांनाही दोनही ठिकाणी वेगळी भूमिका कशी काय? आघाडीकडून कुठलेही निर्णय झाले तरी अमृतांना ते चुकीचे वाटतात. काविळ झालेल्या व्यक्तीला सगळीकडे पिवळंच दिसतं त्याप्रमाणे अमृता फडणवीस यांची मानसिकता झालेली आहे. त्यांनी आता महाराष्ट्रा संदर्भातील भूमिका बदलली पाहिजे." असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.


Updated : 14 Oct 2020 8:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top