Home > News > मंत्रिमंडळात कोणत्या महिलांचा होणार समावेश..

मंत्रिमंडळात कोणत्या महिलांचा होणार समावेश..

मंत्रिमंडळात कोणत्या महिलांचा होणार समावेश..
X

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊनही

न्यायालयिन कचाट्यात सापडल्याने लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला उद्या (ता.९) मुहुर्त मिळाला असून उद्याच विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची

बैठक घेऊन बुधवार ता.१० पासून विधीमंडळाचे पावसाळी आधिवेशन घेतले जाणार आहे. आता उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणत्या महिलांना संधी मिळणार आहे?

गेल्या काही दिवसात झालेल्या दिल्ली दौऱ्यातून निर्णय पुढे आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'नंदनवन' निवासस्थानी जाऊन बैठक घेतली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत त्यांच्यात झाल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी ११ वाजता पहिल्या टप्प्यात काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

दुपारी ३.३० वाजता विधान भवन येथे विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून बुधवारी ता.१० ऑगस्ट पासून विधीमंडळाचे पावसाळी आधिवेशन घेतले जाणार आहे.

विशेष म्हणजे वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमिवर उद्याची शासकीय महोरमची सुट्टी सरकारी कर्मचाऱ्यांची रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, दिनांक ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार, दिनांक ०९ ऑगस्ट ते गुरुवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या असून या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराची उद्याची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. परंतू सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार उद्या सकाळी ११ वाजता किंवा संध्याकाळी ७ वाजता

राजभवनवर शपथविधी पार पडेल. भाजपकडून ८ सदस्य शपथ घेणार असून बंडखोर शिवसेना शिंदे गटाकडून ७ सदस्यांचा मंत्रिमंडळासाठी शपथविधी पार पडणार आहे. यामध्ये नक्की कोणाला संधी मिळणार याची आता जोरदार चर्चा आहे. अध्याम कोणाचीही नावे समोर आलेली नाहीत.

पावसाळी अधिवेशन लांबलेल्या पुरवणी मागण्या मंजूर होऊ शकलेल्या नाहीत. घटनात्मक पेच आणि १२ तारखेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची टांगती तलवार यामुळेच मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार करण्यात येणार असल्याचे समजते. सर्वाच्या न्यायालयाच्या निकालानंतर अपक्ष समर्थक आमदारांचा विस्तारात समावेश होईल. पहिल्या यादीत अपवाद वगळता जुन्या मंत्र्यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी असून खान्देशातून विजयकुमार गावित अणि अमरीश पटेल यांना भाजपकडून संधी दिली जाणार आहे.

Updated : 8 Aug 2022 2:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top